Sunday, September 16, 2018

समृध्दी [भाग १]

MMy First blog...
 Hi Friends,
                    I am  Namita Dahake.Here i am presenting my first blog.
                                                     
                     मी खूपदा विचार केला कि  मला माझे  विचार कुठेतरी मांडायचे आहे .तर माझ्या मते विचार मांडण्यासाठी ब्लॉग हा उत्तम उपाय आहे . 
                     ह्याच दिवसांमधील गोष्ट आहे असंच एक पुस्तक 📖वाचता वाचता त्या पुस्तकातल्या काही ओळी मला फार आवडल्या ,त्या ओळींवरून माझे हे विचार ....... 
                     तर माझ्या पहिल्या ब्लॉगचे शीर्षक आहे  "समृध्दी ". तुम्हाला काय वाटते समृद्धी म्हणजे काय असेल?  पैसा /अडका💰 ,बंगला🏡 ,नॊकर /चाकर ई.   नाही . समृद्धी हा शब्द पाहिल्याबरोबर माझ्याही मनात हाच विचार आला होता . पण हे विचार वगळता ... 
                     समृद्धीचे सुंदर विवेचन एका सुंदर शब्दात म्हणजे समृद्ध विचार .  ज्याचे विचार समुद्ध असतील अर्थातच त्याचे  जीवन समृद्ध असणार! 
           चला तर आपण एक  उदाहरण बघूया, महाभारतातील एक कथा खुप प्रसिद्ध आहे ..... एकदा गुरु द्रोणाचार्य शिष्यांना धनुर्विद्या शिकवत असतांना पक्ष्यांचा डोळा भेदायला सांगतात . म्हणून त्यांनी झाडावर बसलेल्या पक्ष्याचा डोळा फोडण्यासाठी कौरव आणि पांडवांना एकेक प्रश्न विचारला ,कि तुम्ही काय पाहताय ?
सगळ्यांनी वेगवेगेळे उत्तर दिले . कुणी म्हणाले मी पक्षी बघतोय कुणी म्हणाले आकाश तर कुणी म्हणाले झाड फक्त अर्जुन म्हणाला कि मला फक्त नि फक्त पक्ष्याचा डोळा दिसतोय ,आणखी काहीच दिसत नाही.




यावरून हे लक्षात येते कि जीवनात जे साध्य करायच आहे, त्यावर लक्ष केंद्रित केलं तर सहजपणे  साध्य  करता येते. म्हणूनच समृद्ध व्हायच असेल तर समृद्धीचे विचार मनात नेहमी कायम जागते ठेवले  पाहिजे . 
यासंदर्भात आणखी  जाणून घेण्यासाठी लवकरच येत आहे भाग २ ....... 😊

    " Be the Better version of yourself"             I was eagerly waiting for the " now " moment to come in my lif...