Tuesday, October 1, 2019

   "Be the Better version of yourself"


           I was eagerly waiting for the "now" moment to come in my life from the very past days. And now I feel that my wait is somewhat over.To know you thoroughly is the most crucial thing to you. Everyday become a better version of yourself is not only the quote but if you sincerely work on it you will met that version of you one day. Because I observe the version of me from my polytechnic to now.There are many things responsible for this change. 
           For this, I got the guidance of very special person. Whenever I see him I feel the positiveness and happiness in me. Sometimes in daily routine also this happens. when you saw a person who is really matter to you, you feel energetic and happy. Besides your parents, there are many people who you met in life. I think each one of them are resposible to change you.  
        Whenever you are alone and you know that no one can help you, then you are the last option of yourself and on any chance you take that risk and give your 100% to go through the situation.I think being alone is not that much of bad as you think although it allows you to know yourself.
          Believe in your circumstances. The nature will give  you everything that's good for you rather it forces you to do that thing.  There is tremendous power in nature itself, if you will learn how to communicate with that then everything is possible. Every person you met in life, you talk with them, there is purpose of something. If there has no purpose then let me ask you why you met only these people among the  133.92 crores population.
          Always there is good or more than good in something you just have to try to collect them all as you can. Ultimately this attitude of mine brings me here. Today, I am much more better than before. An awesome of me is yet to come. Thanks to nature, thanks to the people who help me to bring the best out of me. 

Wednesday, June 19, 2019

असंच काहीतरी

आज लिहिण्याचा विषय थोडा वेगळा आहे.आताच थोड्या  दिवसांपूर्वी फायनल इयर चे विद्यार्थी आपलें चार वर्ष पूर्ण करून गेले. तेव्हा जाताना त्यांच्या चेहऱ्यावर चं दुःख पाहून मन खूप भरून आलेलं.  तेव्हाच मनात असाही विचार येऊन गेला की पुढच्या वेळेस आपल्यालाही असंच जावं लागणार आहे. एका क्षणाला तर असंही वाटलं,  की आता आपणही फायनल ला जाणार आहोत. कॉलेज जसं चालू होणार तसाच कॅम्पस प्लेसमेंट ची चर्चा सगळीकडे असणार आहे. सगळीकडे  वातावरण हे ह्या मागच्या दोन वर्षांपेक्षा थोडं वेगळं असणार आहे. एकीकडे कॅम्पस च टेन्शन  तर दुसरीकडे हे की आता आपल्याकडे इंजिनीरिंग चे हे एक शेवटचं वर्ष बाकी आहे असं. सिनियर ला जातांना बघत एवढं दुःख तर पॉलीटेकनिक मधेही नाही झालेलं. पॉली काय होत हे  समजायला लागताच लगेच हातातून निसटून गेलं. तिथेही काही लोक मिळाली पण आता कोणाचाही कॉल नसतो ते भेटणं नसते आता फक्त एकमेकांचे स्टेटस तेवढे दिसतात आणि वर्षातून एकदा बर्थडे ला कॉल.याचाही अर्थ असा नाही होत की आम्ही एकमेकांना विसरलो पण काही काही गोष्टी आमच्या प्रायोरिटी नुसार बदलत गेल्या. आता इकडे इंजिनीरिंग ला आल्यावर पण 3rd सेम तर m3 चा अभ्यास करता करता निघून गेल😀. या सेम च्या सुट्ट्या मध्ये Nss कॅम्प ला जाण्याची इच्छा झाली. तिथेही जास्त कोणी ओळखीचं होत असंही काही नाही. पण बनता बनता सगळ्यांशी ओळखी होत गेल्या. माझ्या बडबडया स्वभावामुळे माझ्या ओळखी पटकन होऊन जातात. पण त्यातही काही लोकांना ती नकोशी वाटायला लागते. तिथे अशाच कारणांमुळे काही गैरसमज झाले होते.पण ते  करून काहीही उपयोग नाही ना कारण जोपर्यंत तुम्ही समोरच्या व्यक्तीशी बोलत नाही तोपर्यंत तो कसा आहे हे आपल्याला कधीच कळणार नाही. किंवा तो निष्कर्ष काढनेही चुकीचे ठरेल. Nss मुळे खूप ओळखी झाल्या. मग 4th सेम इंटर्नशिप ची जी हवा पॉली मध्ये नाही लागली ती इथे लागली सगळे करतात म्हणून आपणही करायची. अशातच 2nd, 3rd मध्ये होता होता सिनिअर शी पण ओळखी होत गेल्या त्यांनी पण ओळख दाखवली म्हणून काम सोप्प झालं.  सिनिअर जर कॉलेज मध्ये असतील तर असं जाणवत की अजूनही आपल्याकडे वेळ आहे अजूनही आपण करू शकतो.पण नकळत आपण हे विसरून जातो की त्यांनीही कदाचित असाच विचार केला असावा.अशे काही सिनिअर या इंजिनीरिंग लाईफ मध्ये आलेत. काहींची चांगली सोबत मिळाली. ते गेलेत पण आता सिनिअर होण्याची जबाबदारी आमच्याकडे आलीये. आणि जो हा भ्रम होता की आपल्याकडे वेळ आहे हाही भ्रम तुटला.

Friday, April 19, 2019

प्रेम

                               प्रेम 💗

                        काय असतं प्रेम ....

पाहिल्याबरोबर क्षणात व्हावं ते असतं प्रेम
नऊ महिने पोटात असतांना
न पाहताही आई जे करते, ते असतं प्रेम
न सांगता ईच्छा पूर्ण करणाऱ्या बाबांचं,असतं प्रेम
घरून बाहेर पडतांना आई येते गं
अशी हाक मारण  म्हणजे असतं प्रेम
लहान भावा-बहिणींसाठी
बाहेरून खाऊ घेऊन जाणे, ते असतं प्रेम
टीव्ही च्या रिमोट साठी घरात भांडणे होतात तेही असतं प्रेम
कितीही भांडण झालीत तरी शेवटपर्यंत टिकून राहणं म्हणजे असतं  प्रेम
स्वतःही पेक्षा  जास्त दुसऱ्यावर विश्वास असणे म्हणजे असतं प्रेम,
जे राधा-कृष्णाचं होतं ते असतं  प्रेम
एकत्र न राहूनही मनाचे संवाद ओळखणं असतं प्रेम
जे एका भुकेलेल्या माणसाला एका पोळीशी  आणि तहानलेल्या माणसाला पाण्याशी असतं ते असतं प्रेम
एका वाचकाला आपल्या पुस्तकाशी असतं ते असतं प्रेम
कोणाची तासनतास वाट पाहत बसणं हेही असतं प्रेम
शेवटी प्रेम म्हणजे काय हो डोळ्यासमोर दिसलं कि चेहऱ्यावरची smile असतं प्रेम
बोलायचं असून सुद्धा ओठांवर न आलेले/अपुरे पडलेले शब्द म्हणजे असतं  प्रेम .
   
                            प्रत्येक माणसाची प्रेमाची व्याख्या हि वेगळी आहे. प्रेमाला अशी कोणती विशेष व्याख्याच नाही असं म्हंटल तरीही चालेल. कारण शेवटी प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं . ......

Monday, April 15, 2019

महान कोण? भाग २

                          महान कोण? भाग २

                             भाग १ मधल्या कथेचा नक्की बोध काय? हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असेलच काहींचे उत्तर हेही असेल कि,"एवढं मोठं असं काय  गोष्टीत?एक हट्टी, दुराग्रही मुलगी, मूर्ख शिक्षक,अव्यवहारी चोर आणि बेजबाबदार वडील....
                                नाही.पण हा त्या गोष्टीकडे पाहण्याचा आपाआपला दृष्टिकोन आहे. याच कथेचं विश्लेषण दुसऱ्या दृष्टीने करण्याचा प्रयत्न केला तर,धैर्यशाली रत्नप्रभा, कनवाळू व सहृदय शिक्षक, उदार मनाचा चोर आणि आपल्या मुलीच्या शब्दांना  व मताला किंमत देणारे जबाबदार वडील. आता प्रश्न असा आहे कि, या गोष्टीतील सर्वात महान व्यक्ती कोण?
 कदाचित या गोष्टीचे चार प्रत्येकी एक हे सगळ्यांकडे असू शकते. 
१)कोणाला वाटेल कि रत्नप्रभा थोर आहे कारण एवढे संकट तिच्यापुढे असतांना तरीही ती विचलित झाली नाही.  तिला असंच वाटत होत कि आपण "आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा तर दिलीच पाहिजे."
२)एखाद्याच म्हणणं असही असेल कि आमच्या मते चोरच सगळ्यात थोर म्हणायला हवा;कारण नेहमी  चोर दुसऱ्याला लुटत असतात.समोरच्या माणसाची पर्वा न करता. आणि त्या चोराचा तर कोणाशीच काही संबंध पण नव्हता.त्यामुळे त्या चोराला तर महात्माच म्हटलं पाहिजे. "
३) कोणीं असही म्हणू शकेल कि गुरुजीच थोर होते. कारण रत्नप्रभा त्यांच्या दारात येऊन उभी राहिली तेव्हा त्यांना आश्यर्याचा धक्का बसला आणि तिची काळजी वाटली. त्यांनी तिला काहीच मागितलं नाही.उलट तिला प्रेमाने आशीर्वाद दिले."
४)एखाद्या व्यक्तीचं उत्तर हेही असू शकेल कि तिचे वडील सर्वात थोर होते. "तिच्या वडिलांनी तिला स्वतःचा  निर्णय स्वतः घेण्याचं स्वातंत्र्य दिल आहे.
 
    पण माझ्या  मते ,"खरं तर या कथेत अमुक एक व्यक्ती थोर आहे, असं निश्चितपणे कोणालाच सांगता येणार नाही. कारण आपण कोणाकडे कश्या दृष्टिकोनातून बघतो, त्यावर ते अवलंबून राहील. त्याचप्रमाणे कोणताही प्रश्न समोर येऊन उभा राहिला , कि आपण त्या प्रश्नाकडे  वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहून त्याच्या विभिन्न पैलूंचा विचार केला पाहिजे. त्यामुळे आपण त्यानंतर ज्या निर्णयाला येऊन पोहचू , ते वेगवेगळे असू शकतील. आपली उत्तर  निरनिराळी  असू शकतील.आपण कधीही एखाद्या व्यक्तीवर दोषारोप करतो किंवा त्या व्यक्तीचा धिक्कार करतो,तेव्हा खरं तर त्या परिस्थितीत ती व्यक्ती तसं काबरं वागली असेल,हे समजून घेऊन आपण त्या व्यक्तीच वागणं योग्य होतं कि अयोग्य,  हा निर्णय  दिला पाहिजे."
                                                                                                                                                                                                                                                                                                                                          "कित्येकदा एखाद्या प्रश्नाचं अगदी शंभर टक्के बरोबर उत्तर  नसतंच. अशा वेळी त्या प्रश्नाला काही  उत्तरंच नाही, हेच त्याच उत्तर असू  शकतं.तुमचा त्या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, यावरसुद्धा  बरंचसं अवलंबून असतं. मग आपला जो काही दृष्टिकोन असेल त्याच्या आधारावर आपण इतरांच्या वागण्याबद्दलचे निष्कर्ष काढतो. त्याच वागणं बरोबर कि चूक असा न्यायनिवाडा करतो. "


Monday, March 25, 2019

महान कोण ?भाग १

                            महान कोण ? भाग १ 

                                  
                                    एक साधीशी गोष्ट मला सांगायला आवडेल . तर गोष्ट अशी आहे कि एक रत्नप्रभा नावाची तरुण मुलगी होती. दिसण्यास अत्यंत सुंदर ,श्रीमंत आणि बुद्धिमान .तिने आपलं सर्व  शिक्षण पूर्ण  केलं. आणि  नंतर आपल्या गुरुजींना विचारलं,
            "मी गुरुदक्षिणा म्हणून आपल्याला काय देऊ?"
त्यावर गुरुजी म्हणाले, "तुझ्या वडिलांनी मला सर्वकाही दिलं आहे. तू त्याची काही चिंता करू नको. " पण रत्नप्रभेने हट्टच धरला. आता गुरुजींना जरासा राग आला. आणि ते मनात म्हणाले "आता या मुलीची धैर्याची परीक्षा घ्यायलाच हवी. आणि तिला आता एक अवघड अट घालतो म्हणजे मग ती सारखी त्रास देणार नाही!"
                मग ते रत्नप्रभेला म्हणाले, "अमावास्येच्या रात्री तू दागदागिन्यांनी मढुन,सजून एकटी माझ्या घरी ये ."रत्नप्रभेच्या आणि गुरुजींच्या घराच्या मधात एक घनदाट अरण्य होत. रस्ता अत्यंत खराब होता. अरण्यात हिंस्त्र श्वापदं होती;वाटेत एक नदी पार करावी लागत असे. रत्नप्रभेने क्षणभर विचार केला आणि ती आपल्या घरी निघून गेली. गुरुजी मनोमन खुश झाले. त्यांना वाटलं, आपण बरं हिला गप्प केलं. 

                                   अखेर अमावास्येची रात्र आली. रत्नप्रभेने अंगावर दागदागिने चढवले. आणि ती गुरुगृही जाण्यासाठी सज्ज झाली. तिच्या वडिलांनी तिला पाहिलं आणि ते अतिशय अस्वस्थ झाले. "तू आता अशी यावेळी कुठे निघाली आहेस?" त्यावर तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. तिच्या वडिलांना धक्काच बसला. 
                         ते म्हणाले ,"तुझे गुरुजी सज्जन, सतशील आहेत. कदाचित तूच त्यांना खूप त्रास दिला असशील, म्हणून धडा शिकवण्यासाठी त्यांनी तुला असं करायला सांगितलं असेल . माझी व त्यांची चांगली ओळख आहे. मी उद्या जाऊन त्यांना भेटेन व सारं काही स्पष्ट करून सांगेन. तू आता काही जाऊ नको. ते नक्की तुला क्षमा करतील. तू त्यांच्या मुलीसारखी आहे. 
         पण रत्नप्रभेला काही ते पटलं नाही. तिने जाण्याचा हट्ट धरला तोही गुरुजींना वचन दिल्याप्रमाणे एकटीनेच जाण्याचा! एवढ्या भयानक अरण्यातून ती एकटी चालू लागली. 
                      चालता चालता अचानक अरण्यात कोणीतरी तिला थांबवलं. तो एक तरुण चोर होता. त्याने आयुष्यात एवढे मौल्यवान दागदागिने कधीच पाहिलेले नव्हते. आज आपली चांगली कमाई होणार ,या विचाराने तो खुश झाला. त्याने तिला अडवलं... 
      पण ती क्षणभरही विचलित झाली नाही. ती म्हणाली , मी माझ्या गुरुजींना वचन दिलं आहे कि दागिन्यांनी मढुन तुमच्या घरी येईन. आणि मी दिलेला शब्द नेहमीच पाळते. पण मी माझ्या गुरूंना भेटून परत येतांना हे सर्व दागिने तुम्हाला देईन. 
         तिचं उत्तर ऐकून त्या चोराला फार नवल वाटलं. त्याने  तिला जाऊ दिल. पण तिचा गुपचूप पाठलाग करत तोही निघाला. शेवटी ती गुरुजींच्या घरी जाऊन पोहोचली. तिनं त्यांचा दरवाजा ठोठावला. गुरुजींना तिला पाहून आश्यर्याचा धक्का तर बसला पण खेदही वाटला. ते म्हणाले,"मला वाटलं तू माझं बोलणं विनोद समजून हसण्यावर नेशील. तुला नाउमेद करण्यासाठी मी आपलं तसा म्हणालो. या एवढ्या संकटांना तोंड देऊन तू इथे येशील, असं मला मुळीच वाटलं नव्हतं .तू घरी जा,पोरी. माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. तू आपला शब्द पाळणारी  स्त्री आहेस. "
                    रत्नप्रभा माघारी फिरली, तेवढ्यात तो चोर तिच्यासमोर येऊन उभा राहिला. ती त्याला म्हणाली हे घ्या दागिने त्यावर तो चोर हसून म्हणाला , तुमच्यासारखी स्त्री सापडणे विरळाच. मला तुमच्याकडून काहीसुद्द्धा नको. तुमच्यासारखी माणसं काही नेहमी भेटत नसतात. "
                  रत्नप्रभा घरी पोहोचली . वडील दारात  वाट पाहत होते. तिला पाहून ते खूप आनंदी झाले व तिला म्हणाले ,"तू मोठ्या धीराची मुलगी आहेस. तू दिलेला शब्द पाळलास. आज तू खूप मोठा प्रवास करून आली आहेस. घरात ये आणि विश्रांती घे . 
                  या कथेतून बोध काय घ्यायचा? हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडलेला असेल. म्हणूनच या कथेचा बोध जाणून घेण्यासाठी लवकरच येणार  भाग २ ..... 
                  


                         
                                 






Tuesday, March 5, 2019

मैत्री

                                     मैत्री 💗
             

                         एकेदिवशी असाच मैत्रीबद्दल विचार करता करता मनात आलेले विचार कागदावर उतरवण्याचा छोटासा प्रयत्न  ........
                 माझ्या मते मैत्री म्हणजे काय?  हे चार ओळीत मांडू इच्छिते....
     एक प्यारा सा  दिल जो कभी नफरत नही करता,
      एक प्यारी सी मुस्कान जो कभी फींकी नही पडती
   एक एहसास जो कभी दुःख नही देता
  और एक रिश्ता जो कभी खत्म नही होता
                                                                                                                                                                          या चार ओळींवरून आपणाला "मैत्री म्हणजे काय"? याचा  अंदाज  आला असेलच . जर त्यात द्वेष , ईर्ष्या असेल तर समजून जा कि ती मैत्री नाही आपल्या फायद्यासाठी बनवलेलं एक Fake Relation आहे.
                                                   
                 Some Lines about "मैत्री "👭

                              A friend who is  not your life partner but he hugs you.
    A friend who can  share everything with you,care for you but he is not your family.
                              A friend who can Understand  you more than you
                              A friend who Accept all the Goods and Bads thought of each other.
                              A friend who irritates you like a sister!
                              A friend who  teases you  like a brother !
            And finally loves you more than your life partner so always try to spend few minutes with your loved once because you realize friendship when you loose them and  one day you might get free time but you might not get your friends back.
               LOVE WITH NO EXPECTATION because its feel not a deal.
 And the best part about friendship is that whenever you meet them you feel happy.
                     



                         

Saturday, November 17, 2018

समृद्धी भाग २

                           समृद्धी [भाग २]

           श्री संत गजानन गजानन महाराज कॉलेज ऑफ ईंजिनीरिंग शेगाव मध्ये शुक्रवार दिनांक २१-९-२०१८ ला संकल्प आणि शिवदर्पण ज्या किआमच्या ह्या कॉलेज मधील गर्ल्स & बॉईज हॉस्टेल वर लायब्ररी आहेत . तर त्यांनीच आयोजित केलेल्या कार्यक्रमात श्री अंबरीश पुंडलिक हे प्रमुख व्याख्याते लाभले होते. त्यांनी आपल्या व्याख्यान्यात समृद्धी चा विषयही थोडाफार मांडला होता. त्यामुळे मला हा दुसरा भाग लिहायला त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली . तर समृद्धीविषयी सविस्तर प्रस्तुती ........ 
                      या भागामध्ये आपण समृद्धीची  सांगड निसर्ग ,संकुचित विचार आणि शिक्षण याच्याशी कशी होते हे बघूया ........ 
                निसर्गाचं भांडार हे अतुलनीय आहे. नैसर्गिक संपत्ती हि कुणाची वैयक्तिक नाही. या पृथ्वीतलावावरची कुठलीही घटना ,वस्तू ही चराचर सृष्टी एका परमशक्तीनं बांधलेली आहे. या परमशक्तीशी संबंध आला कि आपल्याला कधी कमी जाणवणार नाही. म्हणूनच सृष्टी किंवा किंवा निसर्गाबरोबर तादात्म्य पावणे म्हणजे सुख आणि निसर्गाशी विरोधी वागणं म्हणजे दुःख म्हणता येईल. जो निसर्गाशी स्वतःला जुळवून घेतो ,त्याला सृष्टीकडून तसाच उत्कट प्रतिसाद मिळतो . तो माणूस स्वतः ला समृद्ध समजतो. किंबहुना तो आपोआताच समृद्ध होतो. त्यामुळे हा त्याचा भाव त्या व्यक्तीची शक्ती आणि आत्मविश्वास वाढवितो. याउलट निसर्गापासून फटकून राहणारा माणूस नेहमी आत्मविश्वासात कमी पडतो. त्याच्यासाठी सृष्टीची नैसर्गिक प्रक्रिया ही एखाद्या अपरिचित सत्तेचा खेळ असते. तर अशी व्यक्ती स्वतःला कशी समृद्ध समजू शकेल, व या कारणांमुळे त्याच्यामध्ये  एकटेपणा घर करते . व तो स्वतःचा आत्मविधाता बनू शकत नाही.

                                               परमेश्वराने पूर्णपणे सर्वस्व झोकुन देऊन सृष्टीची निर्मिती केली आहे.  त्यानी ज्या माणसाच्या गरजा आहेत त्या सर्व पृथ्वीवर उपलब्ध केलेल्या आहेत. त्याचा उपभोग घेण्यामध्ये माणसानी गफलत केली तर त्यात परमेश्वराचा काय दोष?
                                              यावरून एक म्हण आठवली म्हण अशी आहे कि ,घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकता किंवा त्याच्या पुढ्यात पाणी ठेऊ शकता ; पण ते पिण्याचं काम तर घोड्यानाच केलं पाहिजे. 
                 आता संकुचित विचार आणि समृद्धी ची सांगड घालतांना हा उतारा ....... 
                        संकुचित मन संकुचित  विचारांना जन्म देते. ते जुनाट विचारांनी ग्रासलेले असते. हे विचार माणसाला बाहेरच्या दुनियेतून काढून एका बंदिस्त जागेत कोंडतात. त्याचं जीवन ध्येय  सगळं स्वार्थ्याच्या पायावर आधारलेले असते. धान्याच्या बैलासारखं डोळ्यावर पट्टी बांधून दिवस-रात्र काम करूनही त्यांच्यात काहीच फरक पडत नाही. प्रगत विचाराशी त्याचा संबंध राहत नाही. आणि शेवटी त्याला लक्षात येते कि,आता वेळ गेलेली आहे,आपण अगदीच अल्पबुद्धी झालो आहोत. अश्या बुद्धिहीन प्राण्याला कधी समृद्धी मिळत नाही. याउलट सृजनशील मनामध्ये समृद्धी  निवास करते. हे विचार समृद्धीच्या मार्गावर नेतात. आणि नव्या गोष्टीचं स्वागत करणाराच,नवीन विचारांना,सर्जनात्मक प्रतिभेला प्रोत्साहन देणारा, सुखी होतो . 
                                 प्रत्यक्षात समृद्धी हि गुणांमुळे मिळते. डावपेच किंवा कटकारस्थाने  नाही . समृद्धी हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे आणि त्याच्यासाठी केला गेलेला कोणताही प्रयत्न हा निष्फळ ठरत नाही. बऱ्याच लोकांच्या बाबतीत  असे होते कि, कस्तुरी मृगाच्या नाभीत असणाऱ्या कस्तुरीचा रोखाने मृग बाहेर धावतो, त्याप्रमाणे अनेक व्यक्तीही त्यांच्याकडे असणाऱ्या सुखापेक्षा बाहेर सुख शोधत फिरतात. खरंतर समृद्धी  आपल्या बरोबर असते. फक्त ती शोधणे आवश्यक असते. "शोधा म्हणजे सापडेल " हा फक्त जगण्याचा मूलमंत्र असला पाहिजे . आशा ,विश्वास ,श्रद्धा यामुळे जीवन समृद्ध होते. समृद्धी हि उद्योगी लोकांची दासी आहे . 

                       शिक्षण आणि समृद्धीबद्दल सांगड घालतांना .......                                           
            शिक्षण म्हणजे समृद्धी न्हवे, तर शिक्षणाचा पुरेपूर वापर करून स्वतः ला घडवणे, शिक्षणातून संकुचित विचारांना मात देणे आणि सृजनशील विचार मनात आणणे. "समृद्धी म्हणजे व्यक्तिमत्वाचा विकास." त्यात नशिबाचा काहीएक संबंध नाही.             
                   आपले व्यक्तिमत्व सुधारले तर समृद्धी आपल्या पायाशी लोळण घेईल.  

  


          

                                              

    " Be the Better version of yourself"             I was eagerly waiting for the " now " moment to come in my lif...