समृद्धी [भाग २]

श्री संत गजानन गजानन महाराज कॉलेज ऑफ ईंजिनीरिंग शेगाव मध्ये शुक्रवार दिनांक २१-९-२०१८ ला संकल्प आणि शिवदर्पण ज्या किआमच्या ह्या कॉलेज मधील गर्ल्स & बॉईज हॉस्टेल वर लायब्ररी आहेत . तर त्यांनीच आयोजित केलेल्या कार्यक्रमात श्री अंबरीश पुंडलिक हे प्रमुख व्याख्याते लाभले होते. त्यांनी आपल्या व्याख्यान्यात समृद्धी चा विषयही थोडाफार मांडला होता. त्यामुळे मला हा दुसरा भाग लिहायला त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली . तर समृद्धीविषयी सविस्तर प्रस्तुती ........
या भागामध्ये आपण समृद्धीची सांगड निसर्ग ,संकुचित विचार आणि शिक्षण याच्याशी कशी होते हे बघूया ........
निसर्गाचं भांडार हे अतुलनीय आहे. नैसर्गिक संपत्ती हि कुणाची वैयक्तिक नाही. या पृथ्वीतलावावरची कुठलीही घटना ,वस्तू ही चराचर सृष्टी एका परमशक्तीनं बांधलेली आहे. या परमशक्तीशी संबंध आला कि आपल्याला कधी कमी जाणवणार नाही. म्हणूनच सृष्टी किंवा किंवा निसर्गाबरोबर तादात्म्य पावणे म्हणजे सुख आणि निसर्गाशी विरोधी वागणं म्हणजे दुःख म्हणता येईल. जो निसर्गाशी स्वतःला जुळवून घेतो ,त्याला सृष्टीकडून तसाच उत्कट प्रतिसाद मिळतो . तो माणूस स्वतः ला समृद्ध समजतो. किंबहुना तो आपोआताच समृद्ध होतो. त्यामुळे हा त्याचा भाव त्या व्यक्तीची शक्ती आणि आत्मविश्वास वाढवितो. याउलट निसर्गापासून फटकून राहणारा माणूस नेहमी आत्मविश्वासात कमी पडतो. त्याच्यासाठी सृष्टीची नैसर्गिक प्रक्रिया ही एखाद्या अपरिचित सत्तेचा खेळ असते. तर अशी व्यक्ती स्वतःला कशी समृद्ध समजू शकेल, व या कारणांमुळे त्याच्यामध्ये एकटेपणा घर करते . व तो स्वतःचा आत्मविधाता बनू शकत नाही.

परमेश्वराने पूर्णपणे सर्वस्व झोकुन देऊन सृष्टीची निर्मिती केली आहे. त्यानी ज्या माणसाच्या गरजा आहेत त्या सर्व पृथ्वीवर उपलब्ध केलेल्या आहेत. त्याचा उपभोग घेण्यामध्ये माणसानी गफलत केली तर त्यात परमेश्वराचा काय दोष?
यावरून एक म्हण आठवली म्हण अशी आहे कि ,घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकता किंवा त्याच्या पुढ्यात पाणी ठेऊ शकता ; पण ते पिण्याचं काम तर घोड्यानाच केलं पाहिजे.
आता संकुचित विचार आणि समृद्धी ची सांगड घालतांना हा उतारा .......
संकुचित मन संकुचित विचारांना जन्म देते. ते जुनाट विचारांनी ग्रासलेले असते. हे विचार माणसाला बाहेरच्या दुनियेतून काढून एका बंदिस्त जागेत कोंडतात. त्याचं जीवन ध्येय सगळं स्वार्थ्याच्या पायावर आधारलेले असते. धान्याच्या बैलासारखं डोळ्यावर पट्टी बांधून दिवस-रात्र काम करूनही त्यांच्यात काहीच फरक पडत नाही. प्रगत विचाराशी त्याचा संबंध राहत नाही. आणि शेवटी त्याला लक्षात येते कि,आता वेळ गेलेली आहे,आपण अगदीच अल्पबुद्धी झालो आहोत. अश्या बुद्धिहीन प्राण्याला कधी समृद्धी मिळत नाही. याउलट सृजनशील मनामध्ये समृद्धी निवास करते. हे विचार समृद्धीच्या मार्गावर नेतात. आणि नव्या गोष्टीचं स्वागत करणाराच,नवीन विचारांना,सर्जनात्मक प्रतिभेला प्रोत्साहन देणारा, सुखी होतो .
प्रत्यक्षात समृद्धी हि गुणांमुळे मिळते. डावपेच किंवा कटकारस्थाने नाही . समृद्धी हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे आणि त्याच्यासाठी केला गेलेला कोणताही प्रयत्न हा निष्फळ ठरत नाही. बऱ्याच लोकांच्या बाबतीत असे होते कि, कस्तुरी मृगाच्या नाभीत असणाऱ्या कस्तुरीचा रोखाने मृग बाहेर धावतो, त्याप्रमाणे अनेक व्यक्तीही त्यांच्याकडे असणाऱ्या सुखापेक्षा बाहेर सुख शोधत फिरतात. खरंतर समृद्धी आपल्या बरोबर असते. फक्त ती शोधणे आवश्यक असते. "शोधा म्हणजे सापडेल " हा फक्त जगण्याचा मूलमंत्र असला पाहिजे . आशा ,विश्वास ,श्रद्धा यामुळे जीवन समृद्ध होते. समृद्धी हि उद्योगी लोकांची दासी आहे .

शिक्षण आणि समृद्धीबद्दल सांगड घालतांना .......
शिक्षण म्हणजे समृद्धी न्हवे, तर शिक्षणाचा पुरेपूर वापर करून स्वतः ला घडवणे, शिक्षणातून संकुचित विचारांना मात देणे आणि सृजनशील विचार मनात आणणे. "समृद्धी म्हणजे व्यक्तिमत्वाचा विकास." त्यात नशिबाचा काहीएक संबंध नाही.
आपले व्यक्तिमत्व सुधारले तर समृद्धी आपल्या पायाशी लोळण घेईल.
आपले व्यक्तिमत्व सुधारले तर समृद्धी आपल्या पायाशी लोळण घेईल.
Chan
ReplyDeleteTy
DeleteBest..👍😊
ReplyDeleteTy
Delete👍
ReplyDelete🙏
DeleteNice..
ReplyDeleteKeep it up 👌
Thank you jitesh
DeleteThanks
ReplyDeleteAwesome👍
ReplyDeleteKeep it up😊
Thank you roshani
Delete👍👍👍
ReplyDelete"समृद्धी म्हणजे व्यक्तिमत्वाचा विकास." त्यात नशिबाचा काहीएक संबंध नाही 👌 तर ते माणसाच्या कर्मा वर असत|| ....👌👌👌 अप्रतिम लिहलय keep it up .....
ReplyDeleteThank you rajendra
DeleteKhupch chan
ReplyDeleteThank you rohit
ReplyDeleteSunder
ReplyDeleteThank you
DeleteNice one
ReplyDeleteThank you shraddha
ReplyDeleteKhup chan👌👌👍
ReplyDeleteThank you neha
DeleteSundar Namita
ReplyDelete