महान कोण? भाग २
भाग १ मधल्या कथेचा नक्की बोध काय? हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असेलच काहींचे उत्तर हेही असेल कि,"एवढं मोठं असं काय गोष्टीत?एक हट्टी, दुराग्रही मुलगी, मूर्ख शिक्षक,अव्यवहारी चोर आणि बेजबाबदार वडील....
नाही.पण हा त्या गोष्टीकडे पाहण्याचा आपाआपला दृष्टिकोन आहे. याच कथेचं विश्लेषण दुसऱ्या दृष्टीने करण्याचा प्रयत्न केला तर,धैर्यशाली रत्नप्रभा, कनवाळू व सहृदय शिक्षक, उदार मनाचा चोर आणि आपल्या मुलीच्या शब्दांना व मताला किंमत देणारे जबाबदार वडील. आता प्रश्न असा आहे कि, या गोष्टीतील सर्वात महान व्यक्ती कोण?
कदाचित या गोष्टीचे चार प्रत्येकी एक हे सगळ्यांकडे असू शकते.
१)कोणाला वाटेल कि रत्नप्रभा थोर आहे कारण एवढे संकट तिच्यापुढे असतांना तरीही ती विचलित झाली नाही. तिला असंच वाटत होत कि आपण "आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा तर दिलीच पाहिजे."
२)एखाद्याच म्हणणं असही असेल कि आमच्या मते चोरच सगळ्यात थोर म्हणायला हवा;कारण नेहमी चोर दुसऱ्याला लुटत असतात.समोरच्या माणसाची पर्वा न करता. आणि त्या चोराचा तर कोणाशीच काही संबंध पण नव्हता.त्यामुळे त्या चोराला तर महात्माच म्हटलं पाहिजे. "
३) कोणीं असही म्हणू शकेल कि गुरुजीच थोर होते. कारण रत्नप्रभा त्यांच्या दारात येऊन उभी राहिली तेव्हा त्यांना आश्यर्याचा धक्का बसला आणि तिची काळजी वाटली. त्यांनी तिला काहीच मागितलं नाही.उलट तिला प्रेमाने आशीर्वाद दिले."
४)एखाद्या व्यक्तीचं उत्तर हेही असू शकेल कि तिचे वडील सर्वात थोर होते. "तिच्या वडिलांनी तिला स्वतःचा निर्णय स्वतः घेण्याचं स्वातंत्र्य दिल आहे.
पण माझ्या मते ,"खरं तर या कथेत अमुक एक व्यक्ती थोर आहे, असं निश्चितपणे कोणालाच सांगता येणार नाही. कारण आपण कोणाकडे कश्या दृष्टिकोनातून बघतो, त्यावर ते अवलंबून राहील. त्याचप्रमाणे कोणताही प्रश्न समोर येऊन उभा राहिला , कि आपण त्या प्रश्नाकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहून त्याच्या विभिन्न पैलूंचा विचार केला पाहिजे. त्यामुळे आपण त्यानंतर ज्या निर्णयाला येऊन पोहचू , ते वेगवेगळे असू शकतील. आपली उत्तर निरनिराळी असू शकतील.आपण कधीही एखाद्या व्यक्तीवर दोषारोप करतो किंवा त्या व्यक्तीचा धिक्कार करतो,तेव्हा खरं तर त्या परिस्थितीत ती व्यक्ती तसं काबरं वागली असेल,हे समजून घेऊन आपण त्या व्यक्तीच वागणं योग्य होतं कि अयोग्य, हा निर्णय दिला पाहिजे."
"कित्येकदा एखाद्या प्रश्नाचं अगदी शंभर टक्के बरोबर उत्तर नसतंच. अशा वेळी त्या प्रश्नाला काही उत्तरंच नाही, हेच त्याच उत्तर असू शकतं.तुमचा त्या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, यावरसुद्धा बरंचसं अवलंबून असतं. मग आपला जो काही दृष्टिकोन असेल त्याच्या आधारावर आपण इतरांच्या वागण्याबद्दलचे निष्कर्ष काढतो. त्याच वागणं बरोबर कि चूक असा न्यायनिवाडा करतो. "

👌👌👍अगदी बरोबर😇
ReplyDeleteTy neha
DeleteChan👌👌
ReplyDeleteTy
DeleteMast
ReplyDeleteTy mayuri
DeleteMast
ReplyDeleteKhup chhan
ReplyDeleteTy
DeleteNice
ReplyDeleteThank you
DeleteMast
ReplyDeleteTy
DeleteChhan namuuu😘😘
ReplyDeleteThank you sona
DeleteChhan namuuu😘😘
ReplyDeleteजशी आपली दृष्टी👁️ असते तशी आपल्याला सृष्टी🌍 दिसते
ReplyDeleteखुप छान 👌
ReplyDelete