आज लिहिण्याचा विषय थोडा वेगळा आहे.आताच थोड्या दिवसांपूर्वी फायनल इयर चे विद्यार्थी आपलें चार वर्ष पूर्ण करून गेले. तेव्हा जाताना त्यांच्या चेहऱ्यावर चं दुःख पाहून मन खूप भरून आलेलं. तेव्हाच मनात असाही विचार येऊन गेला की पुढच्या वेळेस आपल्यालाही असंच जावं लागणार आहे. एका क्षणाला तर असंही वाटलं, की आता आपणही फायनल ला जाणार आहोत. कॉलेज जसं चालू होणार तसाच कॅम्पस प्लेसमेंट ची चर्चा सगळीकडे असणार आहे. सगळीकडे वातावरण हे ह्या मागच्या दोन वर्षांपेक्षा थोडं वेगळं असणार आहे. एकीकडे कॅम्पस च टेन्शन तर दुसरीकडे हे की आता आपल्याकडे इंजिनीरिंग चे हे एक शेवटचं वर्ष बाकी आहे असं. सिनियर ला जातांना बघत एवढं दुःख तर पॉलीटेकनिक मधेही नाही झालेलं. पॉली काय होत हे समजायला लागताच लगेच हातातून निसटून गेलं. तिथेही काही लोक मिळाली पण आता कोणाचाही कॉल नसतो ते भेटणं नसते आता फक्त एकमेकांचे स्टेटस तेवढे दिसतात आणि वर्षातून एकदा बर्थडे ला कॉल.याचाही अर्थ असा नाही होत की आम्ही एकमेकांना विसरलो पण काही काही गोष्टी आमच्या प्रायोरिटी नुसार बदलत गेल्या. आता इकडे इंजिनीरिंग ला आल्यावर पण 3rd सेम तर m3 चा अभ्यास करता करता निघून गेल😀. या सेम च्या सुट्ट्या मध्ये Nss कॅम्प ला जाण्याची इच्छा झाली. तिथेही जास्त कोणी ओळखीचं होत असंही काही नाही. पण बनता बनता सगळ्यांशी ओळखी होत गेल्या. माझ्या बडबडया स्वभावामुळे माझ्या ओळखी पटकन होऊन जातात. पण त्यातही काही लोकांना ती नकोशी वाटायला लागते. तिथे अशाच कारणांमुळे काही गैरसमज झाले होते.पण ते करून काहीही उपयोग नाही ना कारण जोपर्यंत तुम्ही समोरच्या व्यक्तीशी बोलत नाही तोपर्यंत तो कसा आहे हे आपल्याला कधीच कळणार नाही. किंवा तो निष्कर्ष काढनेही चुकीचे ठरेल. Nss मुळे खूप ओळखी झाल्या. मग 4th सेम इंटर्नशिप ची जी हवा पॉली मध्ये नाही लागली ती इथे लागली सगळे करतात म्हणून आपणही करायची. अशातच 2nd, 3rd मध्ये होता होता सिनिअर शी पण ओळखी होत गेल्या त्यांनी पण ओळख दाखवली म्हणून काम सोप्प झालं. सिनिअर जर कॉलेज मध्ये असतील तर असं जाणवत की अजूनही आपल्याकडे वेळ आहे अजूनही आपण करू शकतो.पण नकळत आपण हे विसरून जातो की त्यांनीही कदाचित असाच विचार केला असावा.अशे काही सिनिअर या इंजिनीरिंग लाईफ मध्ये आलेत. काहींची चांगली सोबत मिळाली. ते गेलेत पण आता सिनिअर होण्याची जबाबदारी आमच्याकडे आलीये. आणि जो हा भ्रम होता की आपल्याकडे वेळ आहे हाही भ्रम तुटला.
Wednesday, June 19, 2019
Subscribe to:
Post Comments (Atom)
" Be the Better version of yourself" I was eagerly waiting for the " now " moment to come in my lif...
-
" Be the Better version of yourself" I was eagerly waiting for the " now " moment to come in my lif...
-
प्रेम 💗 काय असतं प्रेम .... पाहिल्याबरोबर क्षणात व्हावं ते असतं प्रेम नऊ महिने...
👏👏👏👍
ReplyDeleteKhup Chan
ReplyDelete